दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६
"काय माझा गुन्हा...?" भाग ९
गाडीत बसल्यानंतर गौरवी थोडीशी सावरली होती.
थरथर थांबली होती, श्वास जरा स्थिर झाला होता...
पण डोळ्यांत साचलेली वेदना अजूनही तशीच होती...
गाडी शांतपणे पुढे सरकत होती... वायपरचा एकसुरी आवाज
आणि बाहेर पडणाऱ्या थेंबांचा मंद गोंगाट त्या गाडीच्या आतल्या शांततेला अजून गडद करत होता...
आणि बाहेर पडणाऱ्या थेंबांचा मंद गोंगाट त्या गाडीच्या आतल्या शांततेला अजून गडद करत होता...
क्षणभर शांतता पसरते.
आरव, जो मघाशी तिच्यासाठी ढाल बनून उभा राहिला होता,
हळू आवाजात बोलायला सुरुवात करतो...
अगदी सावधपणे, शब्द जपून.
“तुझं नाव काय आहे…?”
आरव, जो मघाशी तिच्यासाठी ढाल बनून उभा राहिला होता,
हळू आवाजात बोलायला सुरुवात करतो...
अगदी सावधपणे, शब्द जपून.
“तुझं नाव काय आहे…?”
तो थोडा थांबतो...
“तू इतक्या रात्री… एवढ्या पावसात… एकटी काय करत होतीस...?”
गौरवी काही बोलत नाही...
“तू इतक्या रात्री… एवढ्या पावसात… एकटी काय करत होतीस...?”
गौरवी काही बोलत नाही...
आरव पुन्हा विचारतो...
“तू कुठे राहतेस...? तुझं लग्न झालंय का...?”
“तू कुठे राहतेस...? तुझं लग्न झालंय का...?”
मग पटकन बोलतो...
“पत्ता सांग... मी तुला तुझ्या घरी सोडतो...”
“पत्ता सांग... मी तुला तुझ्या घरी सोडतो...”
ते शब्द ऐकताच गौरवीच्या डोळ्यांतून अचानक अश्रू वाहू लागतात...
तिचं संपूर्ण अंग शहारून जातं... ती हाताने तोंड झाकते…
पण रडणं थांबत नाही...
तिचं संपूर्ण अंग शहारून जातं... ती हाताने तोंड झाकते…
पण रडणं थांबत नाही...
आरव पूर्णपणे गोंधळतो... तो लगेच गाडी कडेला थांबवतो...
आणि तीला असं रडताना बघून म्हणतो...
“अरे… अरे… सॉरी...! मी जास्त बोललो....
तु तु रडू नकोस ना प्लीज... मी मी तुला काहीच विचारत नाही...”
आणि तीला असं रडताना बघून म्हणतो...
“अरे… अरे… सॉरी...! मी जास्त बोललो....
तु तु रडू नकोस ना प्लीज... मी मी तुला काहीच विचारत नाही...”
तो थोडा नरम होत पुढे म्हणतो...
“पण आधी ते रडणं थांबव... असं रडताना कोणी पाहिलं तर
वेगळेच अर्थ काढतील… आणि मला ते अजिबात नकोय...”
त्याच्या आवाजात ना दया होती, ना चौकशी होती... होती ती
फक्त काळजी...
“पण आधी ते रडणं थांबव... असं रडताना कोणी पाहिलं तर
वेगळेच अर्थ काढतील… आणि मला ते अजिबात नकोय...”
त्याच्या आवाजात ना दया होती, ना चौकशी होती... होती ती
फक्त काळजी...
गौरवी हळूहळू शांत होते... डोळ्यांतलं पाणी पुसते... आणि
खिडकीबाहेर पाहत स्वतःला सावरायचा प्रयत्न करते...
खिडकीबाहेर पाहत स्वतःला सावरायचा प्रयत्न करते...
तेवढ्यात... त्या शांततेत
एक हलकासा, लाजिरवाणा आवाज उमटतो...
टकाटक…
गौरवी स्वतःच दचकते...., कारण पोटातून भुकेचा आवाज येतोय, हे तिच्या लक्षात येतं...
एक हलकासा, लाजिरवाणा आवाज उमटतो...
टकाटक…
गौरवी स्वतःच दचकते...., कारण पोटातून भुकेचा आवाज येतोय, हे तिच्या लक्षात येतं...
ती लाजून मान खाली घालते... आणि तो आवाज ऐकून आरव क्षणभर थबकतो...
मग गाल्यातल्या गालात हलकंसं हसतो...
ते हसू खरंतर चेष्टेचं नव्हतं, तर परिस्थिती हलकी करण्याचं होतं...
मग गाल्यातल्या गालात हलकंसं हसतो...
ते हसू खरंतर चेष्टेचं नव्हतं, तर परिस्थिती हलकी करण्याचं होतं...
तो तीला काहीच विचारत नाही..., कसलाही प्रश्न विचारत नाही..., कसलाही उपदेश देत नाही..., तो कोणतीही बडबड न करता... फक्त गाडीचं स्टिअरिंग
हळूच दुसऱ्या दिशेने वळवतो...
हळूच दुसऱ्या दिशेने वळवतो...
“आधी काहीतरी खाऊया,” तो शांपणाने म्हणतो...
“बाकीचं नंतर पाहू...”
“बाकीचं नंतर पाहू...”
गौरवी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते...
“घाबरू नकोस,” तो नजरेत नजर न घालत म्हणतो...
"तु सुरक्षित आहेस... तुला घाबरण्याचे काही कारण नाही..."
इतका विश्वास माझ्यावर ठेवलास तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे...” असं म्हणत गाडी पुढे निघते...
"तु सुरक्षित आहेस... तुला घाबरण्याचे काही कारण नाही..."
इतका विश्वास माझ्यावर ठेवलास तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे...” असं म्हणत गाडी पुढे निघते...
गाडी वेगाने धावत होती... गौरवी आता थोडी शांत झाली होती, पण तिच्या डोळ्यातील भीती अजूनही उरली होती...
क्रमशः....
©® प्राची कांबळे (मिनू)
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."